वनडेत विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या खेळाडूंच्या टॉप 5 मध्ये तीन भारतीय, जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा जवळ आल्याने वनडे क्रिकेटचं महत्त्व वाढलं आहे. आठ संघ या स्पर्धेत असून जास्तीत जास्त वनडे सामने खेळण्याचा प्रयत्न आहे. पण भारतीय संघ आता थेट पुढच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध वनडे खेळेल.
1 / 6
वनडे फॉर्मेटमध्ये धावांचा पाठलाग करणं सर्वात मोठी बाब ठरते. विकेट सांभाळून विजयी धावा करणं. तसेच संघावरील दडपण कमी करण्याचं आव्हान असतं. असं असताना जगातील टॉप 5 मध्ये 3 भारतीय खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा आहे.
2 / 6
वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 13,906 धावा केल्या आहेत. तर धावांचा पाठलाग करताना 5789 धावा केल्या आहेत. कोहलीने रन चेस करताना 23 शतकं ठोकली आहेत.
3 / 6
दुसऱ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येतो. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये एकूण 18426 धावा केल्या आहेत. तर धावांचा पाठलाग करताना 5490 धावा केल्या आहेत. सचिनने रन चेस करताना 14 शतकं ठोकली आहेत.
4 / 6
तिसऱ्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्मा आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 10866 धावा केल्या आहेत. विजयी धावांचा पाठलाग करताना 4294 धावा केल्या असून यात 12 शतकं आहेत.
5 / 6
चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने धावांचा पाठलाग करताना 4194 धावा केल्या असून यात 8 शतकं आहेत.
6 / 6
पाचव्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस आहे. त्याने धावांचा पाठलाग करताना 3950 धावा केल्या असून तीन शतकं ठोकली आहेत.