आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणारे टॉप 10 यष्टीरक्षक, तीन भारतीयांचा समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाने गोलंदाजी करणे असे क्षण खूपच दुर्मिळ आहेत. पण काही यष्टीरक्षकांनी गोलंदाजीही केली आणि विकेट्सही मिळवले. या यादीत भारताचे तीन यष्टीरक्षक आहेत.
1 / 11
यष्टीरक्षक फक्त फलंदाजी आणि यष्टीरक्षणाची भूमिका बजावतात. पण काही यष्टीरक्षकांनी कीपिंग, बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. चला जाणून घेऊयात टॉप 10 यष्टीरक्षकांबाबत...
2 / 11
टीम इंडियाचे सध्याचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने यष्टीरक्षणासोबत कसोटीत 1 बळी आणि एकदिवसीय सामन्यात 4 बळी घेतले आहेत.
3 / 11
आफ्रिका संघाचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने किपिंगसह गोलंदाजी करत कसोटीत 2 आणि एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.
4 / 11
भारताच्या सय्यद किरमाणी याने कसोटीत 1 बळी घेतला आहे.
5 / 11
श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुसल मेंडिसने गोलंदाजी करत कसोटीत 1 बळी घेतला.
6 / 11
टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 विकेट घेतली आहे.
7 / 11
न्यूझीलंडचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमनेही कसोटीत 1 बळी घेतला आहे.
8 / 11
दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाउचरने कसोटीत 1 बळी घेतला आहे.
9 / 11
श्रीलंकन खेळाडू तिलकरत्ने दिलशानने वनडेमध्ये 106, कसोटीत 39 आणि टी-20मध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत.
10 / 11
झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने T20 मध्ये 1 ODI मध्ये 9 विकेट घेतल्या आहेत.
11 / 11
झिम्बाब्वेच्या टटेंडर टायबूने कसोटीत 1 बळी आणि एकदिवसीय सामन्यात 2 बळी घेतले आहेत.