Cricket | क्रिकेट विश्वातील 5 वेगवान गोलंदाज, ज्यांची अजूनही दहशत

| Updated on: Dec 03, 2023 | 3:31 PM

क्रिकेट विश्वात आतापर्यंत अनेक वेगवान गोलंदाजांनी आपली छाप सोडली. मात्र त्यापैकी असे 5 गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या बॉलिंग स्पीडच्या जोरावर आपली दहशत कायम केली. यामध्ये अनेक क्रिकेट संघांमधील गोलंदाजांचा समावेश आहे. ते बॉलर कोण कोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

1 / 5
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या बॉलिंग स्पीडच्या जोरावर हाहाकार माजवला होता. शोएबच्या नावावर क्रिकेट विश्वातील सर्वात वेगवान बॉल टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. शोएबने 2003 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 161.3 kmph वेगाने बॉल फेकला होता.

2 / 5
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान बॉलर ब्रेट ली हा यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ब्रेट ली याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत सर्वात वेगवान बॉल 2005 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टाकला. ब्रेट ली याने 161.1 kmph या वेगाने बॉल टाकला होता.

3 / 5
तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट आहे.  शॉनने इंग्लंड विरुद्ध 161.1 kmph इतक्या स्पीडने बॉल टाकलेला. दुर्देवाने शॉनची क्रिकेट कारकीर्द बहरु शकली नाही.

4 / 5
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज जेफ थोमसन हे चौथ्या क्रमांकावर आहेत. थोमसन यांनी विंडिज विरुद्ध 1975 मध्ये पर्थ इथे 160.6 वेगाने बॉल टाकला होता.

5 / 5
सक्रीय गोलंदाजांपैकी या टॉप 5 मध्ये एकमेव गोलंदाज आहे तो देखील ऑस्ट्रेलियाचा. मिचेल स्टार्क याने 2015 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 160.4 kmph वेगाने बॉल टाकलेला.