Team India : टीम इंडियासाठी टी 20i मध्ये हायस्कोअर कुणाचा? नंबर 1 कोण?

| Updated on: Nov 16, 2024 | 5:44 PM

High scores for India in T20Is : तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी 15 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i सामन्यात शतक ठोकलं. या निमित्ताने टीम इंडियासाठी टी 20i मध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

1 / 6
संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्यात शतकी खेळी केली. संजूने नाबाद 109 धावा केल्या. तर तिलकने 47 बॉलमध्ये नॉट आऊट 120 रन्स केल्या. तिलक यासह टीम इंडियासाठी टी 20i मध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला.

2 / 6
टीम इंडियासाठी टी 20i फॉर्मेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम शुबमन गिल याच्या नावावर आहे. गिलने न्यूझीलंडविरुद्ध 126 धावा केल्या होत्या.

3 / 6
या यादीत दुसऱ्या स्थानी पुणेकर ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराजने 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 123 धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र त्यानंतर शुबमनने 126 धावा करत ऋतुराजचा रेकॉर्ड उद्धवस्त केला.

4 / 6
तिसऱ्या स्थानी टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली आहे. विराटने  आशिया कप 2022 स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध 122 धावा केल्या होत्या.

5 / 6
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने 2023 साली अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 121 धावांची खेळी केली होती.

6 / 6
तसेच तिलकने 15 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात शतक ठोकलं. तिलकच्या कारकीर्दीतील हे एकूण आणि सलग दुसरं शतक ठरलं. तिलकने या नाबाद 120 धावांच्या खेळीत 10 षटकार आणि 9 चौकार ठोकले.