Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 भारतीय, रोहित कितव्या स्थानी?
Most Runs in Champions Trophy By Team India : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्याची ही नववी वेळ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे? जाणून घ्या.
1 / 6
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आतापर्यंत एकूण 8 वेळा आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तसेच टीम इंडिया 2002 साली श्रीलंकेसह संयुक्तरित्या विजयी होती. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit : Andrew Matthews/PA Images via Getty Images)
2 / 6
शिखर धवन याच्या नावावर टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. धवनने 10 सामन्यांमध्ये 77.88 च्या सरासरीने 701 धावा केल्या आहेत. धवनने या दरम्यान 3 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : Icc)
3 / 6
सौरव गांगुली याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील 13 सामन्यांमध्ये 665 धावा केल्यात. गांगुलीने 73.88 च्या सरासरीने 3 शतकं आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने ही कामगिरी केली. (Photo Credit : Icc)
4 / 6
राहुल द्रविड यानेही चॅम्पियन्स ट्रॉफीत शानदार बॅटिंग केलीय. द्रविडने 19 सामन्यांमध्ये 627 धावा केल्या. द्रविड चॅम्पियन्स ट्रॉफीत संयुक्तरित्या सर्वाधिक अर्धशतकं करणारा फलंदाज आहे. (Photo Credit : AFP)
5 / 6
टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानी आहे. विराटने 88.16 च्या एव्हरेजने 5 अर्धशतकांसह 13 सामन्यांमध्ये 529 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)
6 / 6
रोहित शर्मा याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील 10 सामन्यांमध्ये 53.44 च्या सरासरीने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 481 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)