IPL 2025 : आयपीएल लिलावातील आतापर्यंतचे सर्वात महागडे टॉप 5 खेळाडू, कोण ते जाणून घ्या
आयपीएल लिलावात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. कारण आयपीएल 2025 लिलावात सर्वात मोठी बोली लागली आहे. ऋषभ पंतने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ऋषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपये मोजले आहेत.
1 / 7
आयपीएल मेगा लिलावात आतापर्यंत कोण जास्त भाव खाऊन जातो याची चर्चा रंगली होती. कारण आयपीएल 2023 मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसाठी कोलकात्याने 24.75 कोटी रुपये मोजले होते. हा विक्रम यंदा मोडीत निघणार अशी चर्चा होती. झालंही तसंच.. या लिलावात ऋषभ पंत मोठा भाव खाऊन गेला.
2 / 7
आयपीएल इतिहासात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यानंतर त्याच्यावर नजरा खिळल्या होत्या. अखेर लखनौ सुपर जायंट्सने सर्वात मोठी बोली लावत त्याला संघात घेतलं. 27 कोटी रुपयांची बोली लावल्याने आरटीएम कार्डही फेल गेलं. ऋषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
3 / 7
आयपीएल इतिहासातील महागड्या खेळाडूच्या यादीत दुसरं नाव श्रेयस अय्यरचं येतं. मागच्या पर्वात श्रेयसच्या नेतृत्वात कोलकात्याने जेतेपद जिंकलं होतं. मात्र यावेळी त्याला रिलीज केलं. एका जबरदस्त कर्णधाराची गरज पंजाब किंग्सला होतील. अखेर त्याच्यासाठी पंजाब किंग्सने 26.75 कोटी मोजले आणि त्याला आपल्या संघात घेतलं.
4 / 7
मागच्या पर्वात सर्वात महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्कची चर्चा रंगली होती. कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी खर्च करून त्याला संघात घेतलं होतं. पण रिलीज केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी खर्च करून संघात घेतलं.
5 / 7
वेंकटेश अय्यरसाठी कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपये मोजले आहेत. त्याला संघात घेण्यासाठी आरसीबी आणि कोलकात्यात रस्सीखेच दिसली. पण अय्यरला संघात घेण्यासाठी कोलकात्याने सर्वस्वी पणाला लावलं होतं. मागच्या पर्वातही वेंकटेश अय्यर याच संघातून खेळला होता. मात्र त्याला रिलीज केलं होतं.
6 / 7
आयपीएलमधील महागड्या खेळाडूच्या यादीत चौथं नाव येतं ते पॅट कमिन्सचं.. 2023 मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी 20.50 कोटी मोजले होते. त्याची खेळी आणि कर्णधारपदाची भूमिका पाहून त्याला फ्रेंचायझीने रिटेन केलं आहे.
7 / 7
आयपीएलच्या महागड्या खेळाडूंच्या यादीत सॅम करनचं नाव चर्चेत होतं. पंजाब किंग्सने त्याला 18.50 कोटी खर्च करून घेतलं होतं. पण त्याच्याकडून काही मिळालं नाही. त्यामुळे पंजाबने त्याला रिलीज केलं आहे. आता त्याच्या या लिलावात किती बोली लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.