IPL मध्ये सर्वाधिक कॅच घेणारे टॉप 5 विकेटकीपर, धोनी कितव्या स्थानी?

| Updated on: May 06, 2024 | 5:00 PM

Most Catches iIn Ipl By Wicket Keeper : आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. सध्या 17 व्या हंगाम खेळवण्यात येत आहे. सर्वात यशस्वी विकेटकीपर कोण? पाहा टॉप 5 विकेटकीपर.

1 / 5
आयपीएलमधील सर्वात यशस्वी विकेटकीपरच्या यादीत अनुभवी दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानी आहे.  दिनेश कार्तिकने 245 सामन्यात 141 कॅच घेण्यासह 36 स्टंपिग्स केल्या आहेत. कार्तिक सध्या आरसीबीकडून खेळतोय. त्याने याआधी दिल्ली, पंजाब, मुंबई, कोलकाता आणि गुजरातचं प्रतिनिधित्व केलंय.

2 / 5
ऋद्धीमान साहा तिसऱ्या स्थानी आहे. ऋद्धीमानने 170 सामन्यांमध्ये 93 कॅच घेतल्या आहेत. तसेच 26 जणांना स्टंपमागून आऊट केलंय. ऋद्धीमान गुजरातसह, चेन्नई, केकेआर आणि पंजाबचं नेतृत्व केलंय.

3 / 5
ऋषभ पंत चौथ्या स्थानी आहे. पंतने 109 सामन्यात 75 कॅचसह 21 फलंदाजांना स्टंपिंग केलंय. पंतने 2016 साली डेब्यू केलं होतं.

4 / 5
रॉबिन उथप्पा हा पाचव्या स्थानी आहे. उथप्पने 57 कॅच आणि 33 स्टंपिग्स केल्या आहेत. उथप्पाने मुंबई, आरसीबी, पुणे, केकेआर, राजस्थान आणि चेन्नईचं प्रतिनिधित्व  केलंय.

5 / 5
आयपीएलमधील सर्वात यशस्वी विकेटकीपर हा बहुमान महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आहे. धोनीने आतापर्यंत 260 सामन्यांमध्ये 149 कॅच घेतल्या आहेत. तर 42 स्टंपिंग्स केल्या आहेत. धोनी सध्या चेन्नईचं प्रतिनिधित्व करतोय. धोनीने याआधी पुणे सुपर जायंट्सचं नेतृत्व केलंय.