Cricket | टी 20 मध्ये आशियातील या फलंदाजांचा दबदबा, सूर्यकुमारसह कोण कोण?
टी 20 क्रिकेटमध्ये कमी वेळेत कमी ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग अपेक्षित असते. काही फलंदाज हे त्यापेक्षा पुढे जाऊन जोरदार आणि तोडफोड बॅटिंग करतात. यामध्ये प्रत्येक टीममधून किमान 1 बॅट्समन असा असतो जो झंझावाती खेळी करतो. या 7 फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाच्या 2 खेळाडूंचा समावेश आहे.
1 / 7
सूर्यकुमार यादव याच्या चौफेर फटकेबाजीच्या कौशल्यामुळे मिस्टर 360 म्हटलं जातं. सूर्यकुमारने आतापर्यंत टीम इंडियाला अनेक टी 20 सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवून दिला आहे. सूर्याने 2022 या वर्षात 1 हजार 164 धावा केल्या आहेत.
2 / 7
पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान याने टी 20 मध्ये सर्वाधिक 1 हजार 326 धावा केल्या. रिजवानने नुकत्याच पार पडलेल्या वनडे वर्ल्ड कपमध्येही तोडफोड बॅटिंग केली.
3 / 7
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याने 2021 मध्ये 939 धावा केल्या होत्या. बाबरने तेव्हा पाकिस्तानसाठी निर्णायक भूमिका बजावली होती.
4 / 7
यूएईचा बॅट्समन मोहम्मद वसीम याने 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. वसीम 806 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
5 / 7
आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग यानेही आपल्या बॅटिंगने क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं. पॉलने 2019 या वर्षा सर्वाधिक 748 धावा केल्या.
6 / 7
टीम इंडियाच्या विराट कोहली याने 2022 मध्ये 781 रन्स केल्या. यामध्ये 1 शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश होता.
7 / 7
झिंबाब्वेच्या सिकंदर रजा याने 2022 मध्ये 24 सामन्यांमध्ये 735 रन्स केल्या होत्या. रझाने 150 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या.