पुढच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताची डोकेदुखी कमी होणार! पॅट कमिन्स म्हणाला..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या कसोटी मालिकेतील तीन सामने संपले आहेत. एक सामना अनिर्णित ठरल्यानंतर मालिकेत 1-1 ने बरोबरी आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने निर्णायक ठरणार आहे. असं असताना आर अश्विनने निवृत्ती घेतली. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. नेमकं असं काय घडलं ते जाणून घ्या.
1 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. अजूनही या मालिकेतील दोन सामने शिल्लक असून त्यावरून या मालिकेचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. मालिकेतील चौथा आणि बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
2 / 6
तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि भारताविरुद्ध कायम चांगली कामगिरी करणारा ट्रेव्हिस हेड जखमी झाला आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात ट्रेव्हिस हेड खेळण्याबाबत साशंकता आहे.ट्रेव्हिस हेडच्या पायाला हलकी सूज असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी हेडला ग्रोइन इंजरी झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे चौथ्या कसोटीत खेळेल की नाही यााबाबत शंका आहे.
3 / 6
ट्रेव्हिस हेडने स्वत:च सांगितलं की, हलकी सूज आहे आणि पुढच्या सामन्यापर्यंत बरा होईल. त्याचबरोबर कर्णधार पॅट कमिन्सनेही सांगितलं की, चिंता करण्याचं कारण नाही. पुढच्या सामन्यासाठी अजून बराच वेळ आहे. फिजिओ आणि बाकी टीम हेडसोबत आहेत. आशा आहे की तो लवकर ठीक होईल आणि पुढचा सामना खेळेल.
4 / 6
ट्रेव्हिस हेड तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात फक्त 17 धावा करून बाद झाला. पण या मालिकेत त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पहिल्या डावात 152 धावांची खेळी केल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.या मालिकेत आणि ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
5 / 6
मालिकेत ट्रेव्हिस हेडची विकेट मिळवणे टीम इंडियासाठी कठीण काम असल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे हेड चौथ्या कसोटीतून बाहेर गेल्यास टीम इंडियाच्या पथ्यावर पडणार आहे. हेडच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं
6 / 6
हेडशिवाय ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी विभाग कमकुवत दिसत आहे. हेडने तीन सामन्यांत 81.80 च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. पर्थमध्येही त्याने 89 धावांची खेळी खेळली होती.