टीम इंडियाची ‘गंभीर’ स्थिती, प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असं काही घडलं

| Updated on: Oct 26, 2024 | 9:56 PM

गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून टीम इंडियाच्या वाट्याला नको ते विक्रम प्रस्थापित झाले आहेत. लाजिरवाण्या पराभवामुळे क्रीडारसिकांनी आगपाखड केली आहे. वनडे आणि कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षात जे घडलं नाही ते नशिबी आलं आहे.

1 / 7
भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असे पराभव होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

2 / 7
गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा पहिला परदेश दौरा केला. टीम इंडियाने टी20 मालिका जिंकून चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर वनडे मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. यासह 27 वर्षांनंतर भारताची श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहिलेली  टीम इंडिया पहिली वनडे मालिका ठरली आहे.

3 / 7
भारतीय संघ एका वर्षात वनडे जिंकण्यात अपयशी ठरण्याची गेल्या 45  वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने या वर्षात फक्त 3 वनडे खेळल्या आहेत ज्यापैकी दोन हरले आहेत आणि 1 बरोबरीत आहे.

4 / 7
बंगळुरूमध्ये झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यासह टीम इंडियाने 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम केला. याआधी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारतात कसोटी जिंकली होती.  19 वर्षांनंतर टीम इंडिया बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात हरली. यापूर्वी 2005 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.

5 / 7
न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव 46 धावांत आटोपला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर टीम इंडियाचा डाव 50 धावांवर आटोपला.

6 / 7
टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत पराभव झाला असून यासोबतच भारतीय संघाने ही मालिकाही गमावली आहे. 12 वर्षांनंतर भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली.

7 / 7
या मालिकेपूर्वी टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. मात्र आता ही विजयी घोडदौड थांबली आहे. भारताने 4302 दिवसांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.