भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपल्या फिरकीने इंग्लंडच्या गोलंदाजांना नाचवलं आहे. वरुण चक्रवर्तीने 2021 मध्ये टी20 फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्यानंतर हवी तशी संधी मिळाली नाही. पण 2024 या वर्षात त्याने चांगलं कमबॅक केलं.
वरुण चक्रवर्तीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 4 षटकं टाकली. यात 23 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 5.80 चा होता.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक केल्यानंतर वरुण चक्रवर्तीने 8 सामने खेळला आहे. या सामन्यात त्याने एकूण 20 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याचा एव्हरेज हा 11.70 ची आहे. तर स्ट्राईक रेट हा 9.6 चा आहे. तसेच 7.31 चा इकोनॉमी रेट आहे.
वरुण चक्रवर्तीने कमबॅक केल्यानंतर आठ पैकी सात सामन्यात प्रत्येकी दोन विकेटची नोंद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं चांगलं कमबॅक झालं आहे असंच म्हणावं लागेल.
वरुण चक्रवर्ती आतापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. यात 17 धावा देत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. ' मी भारतातील सर्व देशांतर्गत आणि इतर सर्व स्पर्धा खेळण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. मी मागे बरंच क्रिकेट खेळलो होतो. त्यामुळे मला आयपीएलमध्ये आत्मविश्वास मिळाला आणि देशासाठी पुनरागमन करू शकलो. तेव्हा मला खूप मदत झाली"., असं वरुण चक्रवर्ती याने सांगितलं. (सर्व फोटो- बीसीसीआय)