13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने नोंदवला आणखी एक विक्रम, भारतासाठी केली अशी कामगिरी
भारतात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. देशांतर्गत सुरु असलेल्या स्पर्धेत नवे विक्रम मोडले आणि रचले जात आहे. असं असताना पहिल्याच सामन्यात बिहारच्या वैभव सूर्यवंशीने एका विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी अली अकबरच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे.
1 / 5
देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए सामन्यात पदार्पण केलं. बिहारकडून खेळताना पहिल्या सामन्यात वैभव काही खास करू शकला नाही. त्याने 2 चेंडूंचा सामना केला आणि 4 धावा केल्या. पण त्याने एका विक्रमाची नोंद केली आहे.
2 / 5
वैभव सूर्यवंशीने जागतिक पातळीवर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतासाठी लिस्ट ए स्पर्धेत खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीत बिहारकडून मध्य प्रदेशविरुद्ध सामना खेळत हा विक्रम नोंदवला आहे.
3 / 5
वैभव सूर्यवंशी मध्य प्रदेशविरुद्ध सामना खेळला तेव्हा 13 वर्षे 269 वर्षांचा होता. यासह त्याने अली अकरबरचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अली अकबरने 1999/2000 मध्ये विदर्भासाठी लिस्ट ए सामन्यात पदार्पण केलं होतं. तेव्हा तो 14 वर्षे 51 दिवसांचा होता.
4 / 5
वैभव सूर्यवंशी नुकताच अंडर 19 आशिया कप स्पर्धेत खेळला होता. या स्पर्धेत त्याने आपल्या कामगिरीची छाप सोडली. पाच सामन्यात 176 धावा केल्या. पण अंतिम फेरीत काही खास करता आलं नाही. त्यामुळे बांगलादेशकडून अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
5 / 5
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला आयपीएल मेगा लिलावात चांगला भाव मिळाला. राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात घेतलं. 30 लाखांची बेस प्राईस असताना 1 कोटी 10 लाखांपर्यंत त्याच्यासाठी चढाओढ दिसली. पण राजस्थानने मोठी बोली लावून त्याला संघात घेतलं. वैभव आता आयपीएल 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.