विनोद कांबळीने आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात एकदम धडाकेबाज पद्धतीने केली. पहिल्या 7 कसोटी सामन्यातच 4 शतकं ठोकली. यात दोन द्विशतकांचा समोवश होता. कांबळीने पहिल्या 14 कसोटीतच 1000 धावा केल्या. त्याचा हा विक्रम सचिन असो की विराट कोणताही भारतीय क्रिकेटर मोडू शकला नाही.
डावखुरा विनोद कांबळी हा कसोटीत द्विशतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने 21 वर्षे आणि 32 दिवसांचा असताना 223 धावा केल्या. कसोटीत द्विशतक ठोकणारा तिसरा युवा फलंदाज आहे.
विनोद कांबळीचा कसोटी क्रिकेटमधील आलेख एकदम चढता राहिला आहे. 59 डावात एकदाही शून्यावर बाद झाला नाही. पण नंतर शॉर्ट बॉल खेळताना अडचण येऊ लागली आणि फॉर्म गमवून बसला. त्यानंतर प्लेइंग 11 मध्ये संधीच मिळाली नाही.
विनोद कांबळी कसोटीत सलग दोन द्विशतकं ठोकणारा पहिला फलंदाज आहे. त्यानंतर अशी कामगिरी करण्यात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालला यश आलं. पण सचिनला असं करता आलं नाही.
वाढदिवशी शतक ठोकण्याचा मानही विनोद कांबळीला मिळाला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. 18 जानेवारी 1993 मध्ये त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्याने वाढदिवशी शतक ठोकलं.