Asia Cup 2023 : रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने रचला आणखी एक विक्रम, काय केलं ते वाचा

| Updated on: Sep 13, 2023 | 10:25 PM

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरुच आहे. क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. वनडे फॉर्मेटमध्ये या दोघांनी कोणता विक्रम नोंदवला ते वाचा

1 / 7
सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. या विजयांसह भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांवर विक्रमांची नोंद पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

2 / 7
विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने वनडे फॉर्मेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली 5000 धावांची भागीदारी करणारी आठवी जोडी आहे. सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यानंतर तिसरी जोडी आहे.

3 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने कमी सामन्यात 5000 धावा पूर्ण केल्या. या जोडीने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांचा विक्रम मोडीत काढला.

4 / 7
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या जोडीने एकूण 8227 धावा केल्या आहेत. ही जोडी वनडे फॉर्मेटमध्ये अव्वल स्थानी आहे.

5 / 7
श्रीलंकेच्या महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा ही जोडी दुसऱ्या स्थानावर आहे. या जोडीने 5992 धावा केल्या आहेत.

6 / 7
श्रीलंकेचा दिलशान आणि संगकारा ही जोडी तिसऱ्या स्थानावर आहे. या जोडीने 5475 धावा केल्या आहेत. तर अटापट्टू आणि जयसूर्या या जोडी 5462 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

7 / 7
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या जोडीनंतर रोहित-धवन या जोडीने मिळून 5193 धावा केल्या आहेत.