Virat Kohli : विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड, मास्टर ब्लास्टर सचिन अजूनही नंबर 1 वर

| Updated on: Sep 28, 2023 | 6:28 PM

Virat Kohli : रनमशिन म्हणून ख्याती असलेला विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहलीने तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगचा सर्वात मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

1 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली 61 चेंडूत एक षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. या कामगिरीमुळे विराटच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे.

2 / 6
विराट कोहली याने नवडे क्रिकेटमध्ये 113 हून अधिक वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 20 व्यांदा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

3 / 6
अर्धशतकी खेळी करत विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकलं आहे. पाँटिंगने 112 वेळा अशी कामगिरी केली होती. आता विराट कोहली तिसऱ्या स्थानावर असून रिकी पाँटिंग चौथ्या स्थानी घसरला आहे.

4 / 6
50 हून अधिक धावा करण्याच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेट कारकिर्दीत अशी किमया 145 वेळा केली आहे.

5 / 6
सचिन तेंडुलकर 145, कुमार संगकारा 118, विराट कोहली 113, रिकी पाँटिंग 112 आणि जॅक कॅलिसने 103 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

6 / 6
वनडेत विराट कोहली तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजी करतो. त्यामुळे विना ओपनर 50 हून अधिक धावा विक्रम प्रस्थापित केला आहे. कुमार संगकारा आणि विराट कोहली यांनी 112 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.