सचिनला जमलं नाही ते विराट कोहली करणार? 100 व्या कसोटीत ‘महा’शतकाची प्रतीक्षा
टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीसाठी (Virat Kohli 100th Test) मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणारा कसोटी सामना खूप खास आहे. विराट कोहलीला त्याचं स्वप्न साकार करण्याची संधी मोहालीच्या मैदानावर मिळणार आहे.
1 / 5
टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीसाठी (Virat Kohli 100th Test) मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणारा कसोटी सामना खूप खास आहे. विराट कोहलीला त्याचं स्वप्न साकार करण्याची संधी मोहालीच्या मैदानावर मिळणार आहे. मोहालीमध्ये विराट कोहली आपला 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार असून हा सामना आणखी खास बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या 100 व्या कसोटीत विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी असेल. (PC-AFP)
2 / 5
विराट कोहली शतक झळकावून शंभरावा कसोटी सामना यादगार करेल अशी अपेक्षा तमाम भारतीयांना आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही क्रिकेटपटूला 100 व्या कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. एकूण 11 भारतीय खेळाडूंनी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत आणि या विशेष यादीत विराट कोहली आपले नाव समाविष्ट करणार आहे. 100 व्या कसोटीत शतक झळकावणारा विराट कोहली पहिला भारतीय ठरेल अशी आशा आहे. (PC-AFP)
3 / 5
100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम आतापर्यंत 9 खेळाडूंनी केला आहे. सर्वप्रथम, 1968 साली इंग्लंडच्या कॉलिन काउड्रेने 100 व्या कसोटीत शतक झळकावले होते. त्यांच्याशिवाय जावेद मियांदाद, गॉर्डन ग्रीनिज, अॅलेक स्टीवर्ट, इंझमाम-उल-हक, रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ, हाशिम आमला आणि जो रूट यांनी ही कामगिरी केली आहे. (PC-AFP)
4 / 5
क्रिकेटच्या इतिहासात रिकी पॉन्टिंग हा एकमेव खेळाडू आहे ज्याने आपल्या 100 व्या कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. पाँटिंगने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही डावांत शतक झळकावले होते. विराट कोहलीकडूनही अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (PC-AFP)
5 / 5
आपल्या 100 व्या कसोटीत विराट कोहली 38 धावा करून 8000 कसोटी धावा पूर्ण करेल. ही कामगिरी करणारा तो भारताचा केवळ सहावा खेळाडू असेल. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग यांनी हा आकडा पार केला आहे. (PC-AFP)