आयपीएल 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिलाच सामना 22 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. कारण या सामन्यातून सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे जायचं आहे. असं असताना विराट कोहलीने मनातील एक भीती व्यक्त केली आहे.
आरसीबीने घेतलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीने सांगितलं की, आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहचा सामना करणं खरंच खूप कठीण आहे. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे त्याचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही असं विराट कोहलीने सांगितलं .
जसप्रीत बुमराहाच्या गोलंदाजीचा सामना करताना विराट कोहली काही वेळा बाद झाला आहे. नेटमध्येही त्याचा सामना करणं होतं असं विराट कोहली म्हणाला. इतकंच काय तर त्याच्या प्रत्येक चेंडूचा सामना करताना मानसिक तयारीत राहणं आवश्यक असतं.
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह आयपीएलच्या 16 डावात एकमेकांसमोह आला आहेत बुमराहने त्याला 95 चेंडू टाकले असून विराटने त्यावर 140 धावा काढल्या आहेत. पण पाचवेळा तंबूत परतावं लागलं आहे. विराटने बुमराहला 15 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नाही. मात्र 7 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील. तेव्हा या सामन्यात विराट-बुमराह हे द्वंद्व दिसू शकते. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)