PAK vs IND | विराट कोहली याचं धमाकेदार शतक, वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, सचिनसाठी धोक्याची घंटा

| Updated on: Sep 11, 2023 | 10:32 PM

Virat Kohli Sachin Tendulkar | विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध धमाकेदार शतक ठोकत अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले. विराटला या शतकामुळे सचिनचा मोठा वर्ल्ड रेकॉर्डचा ब्रेक करण्याची संधी आहे.

1 / 6
टीम इंडियाच्या विराट कोहली याने आशिया कप 2023 सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना बॅटने तोडून काढला. विराटने पाकिस्तान विरुद्ध 122 धावांची नाबद शतकी खेळी केली.

2 / 6
विराटने या दरम्यान वेगवान 13 हजार वनडे धावा करत सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला. आता विराटच्या निशाण्यावर  सचिनचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

3 / 6
विराटने पाकिस्तान विरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 47 वं शतक ठोकलं. विराटने 267 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यामुळे आता विराटला सचिनचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा वर्ल्ड  रेकॉर्ड  ब्रेक करण्याची संधी आहे. विराट यापासून फक्त 3 शतक दूर आहे. विराट येत्या वनडे वर्ल्ड कपमध्ये हा कारनामा करु शकतो.

4 / 6
 सचिनच्या नावावर वनडेत सर्वाधिक 49 शतकांचा विश्व विक्रम आहे. सचिनने ही 49 शतकं 452  डावात केली आहेत. विराटमुळे आता सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात आहे.

5 / 6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा हा सर्वाधिक वनडे शतकांच्या बाबतीत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने 240 डावात 30 एकदिवसीय शतकं केली आहेत.

6 / 6
तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने 365 डावांमध्ये 30 शतकं केली आहेत. यामुळे रोहितकडेही आणखी एक शतक करुन रिकी पॉन्टिंग याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.