IPL 2024 : विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा, आता डेविड वॉर्नरला टाकलं मागे

| Updated on: Mar 30, 2024 | 8:56 PM

आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीचा फॉर्म कायम असल्याचं दिसून आलं आहे. सलग दोन सामन्यात विराट कोहलीन अर्धशतक झळकावलं आहे. तसेच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. या खेळीसह विराट कोहलीने एका विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 6
विराट कोहली क्रिकेटच्या अशा टप्प्यावर आहे जिथे काही ना काही विक्रम त्याची वाट पाहात आहे. गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण खेळीमुळे त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आता कोलकात्याविरुद्ध नाबाद 83 धावांची खेळी करत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

2 / 6
टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा विराट कोहली आयपीएल स्पर्धेत आरसीबीसाठी सलामीला येतो. फाफसोबतची त्याची जोडी सर्वोत्तम जोडीपैकी एक आहे. आता सलामीवीर विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

3 / 6
केकेआरविरुद्ध विराट कोहली सलामीला आला होता आणि 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. आयपीएल इतिहासात सलामीला येत नाबाद राहण्याची त्याची 16वी वेळ आहे. यासह विराट कोहलीने डेविड वॉर्नरला मागे टाकलं आहे.

4 / 6
वॉर्नर आणि ख्रिस गेल सलामीला येत 15 वेळा नाबाद राहिले आहेत. ख्रिस गेल निवृत्त झाला असून डेविड वॉर्नर अजूनही खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो सलामीला उतरतो.

5 / 6
सलामीला येत सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रम पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनच्या नाबावर आहे. त्याने 23 वेळा नाबाद राहण्याची किमया साधली आहे. हा मोडण्यासाठी विराट कोहलीला आणखी 7 सामने नाबाद राहावं लागेल.

6 / 6
केकेआरविरुद्ध सामन्यात 4 षटाकर मारत आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. ख्रिस गेलच्या नावावर 239 आणि एबी डिव्हिलियर्सच्या नावावर 238 षटकार आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर 241 षटकारांची नोंद आहे.