PAK vs IND | Virat Kohli याची कोलंबोत ऐतिहासिक कामगिरी, शतकासह रचला इतिहास
Virat Kohli Team India | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंढड्या उडवत तडाखेदार शतकी खेळी केली. विराटने यासह मोठा रेकॉर्ड केला.
1 / 6
केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने पाकिस्तान विरुद्ध 233 धावांची नाबाद विक्रमी भागीदारी केली. टीम इंडियाने या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 357 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.
2 / 6
विराटने 94 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 कडक सिक्सच्या मदतीने 122 धावांची नाबाद शतकी खेळी केली. विराटने या शतकासह मोठा रेकॉर्ड केला आहे.
3 / 6
विराट कोहली हा कोलंबोचा किंग ठरला आहे. विराटचं कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममधील हे चौथं वनडे शतक ठरलं आहे.
4 / 6
विराट कोहली याने आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 2012 साली पहिलं शतक ठोकलं. विराटने तेव्हा श्रीलंका टीम विरुद्ध 2012 साली जुलै महिन्यात 119 बॉलमध्ये नॉट आऊट 128 रन्स केल्या होत्या.
5 / 6
विराटने त्यानंतर 2017 या वर्षात 2 शतकं ठोकली. कोहलीने सप्टेंबर 2017 मध्ये 116 चेंडूत नाबाद 110 धावांची खणखणीत खेळी केली.
6 / 6
तर त्याआधी 2017 या वर्षातील ऑगस्ट महिन्यात विराटने फक्त 96 बॉलमध्ये 131 धावा कुटल्या होत्या.