IND vs SL : विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

| Updated on: Nov 02, 2023 | 4:29 PM

विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहली पुन्हा एकदा रनमशिन्स असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला चांगलाच सूर गवसला. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करत काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एक कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

2 / 6
विराट कोहली याने 2023 या कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधक 1000 हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याने अव्वल स्थान गाठलं आहे.

3 / 6
विराट कोहली याने आठव्यांदा एका कॅलेंडर वर्षात 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रम होता. त्याने 7 वेळा अशी कामगिरी केली आहे.

4 / 6
विराट कोहली याने 2011 मध्ये 1381 धावा, 2012 मध्ये 1026 धावा, 2013 मध्ये 1268 धावा, 2014 मध्ये 1054 धावा, 2017 मध्ये 1460 धावा, 2018 मध्ये 1202 धावा, 2019 मध्ये 1377 धावा आणि आता 2023 मध्ये 1000हून अधिक धावा केल्या आहेत.

5 / 6
आशियामध्ये वनडे क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा मानही मिळाला आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा चौथा फलंदाज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा या खेळाडूंचा सामवेश आहे.

6 / 6
विराट कोहलीने 159 डावात 8000 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने 188 डावात, कुमार संगकाराने 213 डावात आणि सनथ जयसूर्याने 254 डावात ही कामगिरी केली आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय ट्विटर)