विराट भाऊ जोमात, फक्त 98 धावा बाकी, करणार हा विक्रम
विराट कोहली सध्या चांगलाच जोमात आहे. आयपीएलमधली सगळी कसर या विराटनं आशिया चषकात भरून काढलीय. आता त्याला एक नवा विक्रम आपल्या नावावर करायचा आहे. याविषयी जाणून घ्याय...
1 / 5
विराट भाऊ जोमातआशिया चषकानंतर सगळीकडे विराटच विराट होऊ लागलं. कारण, तो त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. त्यांना चाहत्यांना असलेली शतकाची प्रतीक्षा संपवली. कारण, आयपीएलच्या वेळेस चाहत्यांनी त्याच्यावर चांगलाच राग काढला होता. ती कसर त्यानं आशिया चषकात भरून काढली. विराटनं आशिया चषकात तीन वर्षांपासून सुरू असलेली आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा संपवली. यात कोहलीनं दोन अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं.
2 / 5
आता कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगत आणण्यासाठी सज्ज झाला असून या मालिकेत तो एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विराट कोहली विशेष स्थान मिळवू शकतो. टी-20 फॉरमॅटमध्ये 11,000 धावा करण्यापासून तो फक्त 98 धावा दूर आहे. कोहलीच्या या फॉरमॅटमध्ये सध्या 349 सामन्यांमध्ये 10,9032 धावा आहेत. T20 फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय सामने, T20 लीग सामने आहे.
3 / 5
विराटला हे लक्ष गाठण्यासाठी आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आतापर्यंत भारताचा कोणताही फलंदाज टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला आहे.
4 / 5
टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 11,000 हून अधिक धावा करणारे तीन फलंदाज आहेत. यात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, पाकिस्तानचा शोएब मलिक, कीरन पोलार्ड. या तिघांनीही टी-20 मध्ये आतापर्यंत 11,000 हून अधिक धावा केल्यायत.
5 / 5
टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलनं 463 सामन्यात 14,562 धावा केल्या आहेत. शोएब मलिक 480 सामन्यांमध्ये 11,893 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्ड 611 सामन्यांत 11,837 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.