विराटच्या IPL मध्ये सर्वाधिक धावा, पण विजयात योगदानाबाबत फ्लॉप, आकडे पाहा
IPL Virat Kohli : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप 10 यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी आहेत. मात्र 10 फलंदाजांचं टीमच्या विजयातील योगदान पाहिलं तर विराट सपशेल अपयशी ठरलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1 / 5
आरसीबीच्या विराट कोहली याच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. विराटच्या नावावर 7 हजारांपेक्षा अधिक धावांची नोंद आहे.
2 / 5
मात्र विराटचं आरसीबीच्या विजयात किती योगदान आहे? हा प्रश्नच आहे. विराटने आतापर्यंत केलेल्या एकूण धावांच्या 51.12 टक्के धावाच या आरसीबीच्या विजयात उपयोगी आल्या आहेत.
3 / 5
टीमच्या विजयाच्या योगदानाबाबत विचार केला तर टॉप 10 फलंदाजांमध्ये विराट नवव्या स्थानी आहे. विराटच्या तुलनेत रोहित शर्मा, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या धावा कमी आहेत. मात्र या तिघांनी आपल्या संघाच्या विजायत अधिक धावांचं योगदान दिलं आहे.
4 / 5
आयपीएलमध्ये विजयात सर्वाधिक धावांचं योगदान देण्याचं विक्रम हा सुरेश रैना याच्या नावावर आहे. रैनाच्या एकूण धावांपैकी 64.38 धावा या टीमच्या विजयात कामी आल्या आहेत.
5 / 5
ख्रिस गेल आणि रोहित शर्मा आयपीएल इतिहासात हायेस्ट रन गेटर यादीत अनुक्रमे चौथ्या आणि आठव्या स्थानी आहेत. मात्र गेलच्या 62.75 आणि रोहितच्या 60.97 टक्के धावा या टीमच्या विजयात आल्या आहेत.