टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार, आता हा विक्रम रडावर
विराट कोहली टीम इंडियाच्या भात्यातील प्रमुख अस्त्र आहे. आतापर्यंत त्याने आपल्या बॅटने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. विराट खेळपट्टीवर असला की भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटतो. आता विराट कोहली अशाच एका विक्रमाच्या वेशीवर आहे.
1 / 7
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली मैदानात उतरला नाही. अमेरिकेत उशिरा आल्याने आरामाची गरज असल्याचं रोहित शर्माने सांगितलं. पण विराट कोहली या वर्ल्डकपमध्ये एक खास विक्रम रचू शकतो.
2 / 7
भारत आणि आयर्लंडविरुद्ध पहिला सामना 5 जूनला होणार आहे. या सामन्यात निश्चितच विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार आहे. या सामन्यातून विराट कोहलीच्या नव्या विक्रमाची सुरुवात होणार आहे.
3 / 7
टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. सुपर 8 फेरीत प्रवेश केल्यास आणखी 3 सामने वाटेला येतील. सेमीफायनल आणि फायनल खेळल्यास विराट कोहलीला एकूण 9 सामने खेळण्याची संधी मिळेल.
4 / 7
विराट कोहली नऊ सामन्यांतून अनेक विक्रम रचण्याची अपेक्षा आहे. या नऊ सामन्यात त्याच्याकडून खूप साऱ्या धावांची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कोहलीने 15 सामन्यांत 741 धावा केल्या आहेत.
5 / 7
विराट कोहलीने साखळी फेरीत 9 चौकार मारताच टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याचा विश्वविक्रम करेल. या यादीत श्रीलंकेचा महेला जयवर्धने (111) पहिल्या क्रमांकावर, तर विराट कोहली (103) दुसऱ्या स्थानावर आहे.
6 / 7
विराट कोहलीच्या नावावर टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. कोहलीने 2014 मध्ये 4 अर्धशतकांसह 319 धावा केल्या होत्या. आता हा विक्रमही त्याच्या रडारवर असेल.
7 / 7
विराट कोहलीला टी20 विश्वचषकाच्या इतिहासात 1500 धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळू शकतो. त्याला फक्त 359 धावांची गरज आहे. त्याचा फॉर्म पाहता हे शक्य आहे.