आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर? नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jul 02, 2024 | 9:41 PM

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मात्र आरसीबीच्या गोटात काही वेगळंच चित्र आहे. आरसीबी विराट कोहलीला वगळता इतर खेळाडूंना वगळू शकते. 39 वर्षीय फाफ डुप्लेसिसला वगळण्याची दाट शक्यता आहे.

1 / 5
आयपील स्पर्धेच्या आतापर्यंत झालेल्या 16 पर्वात आरसीबीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही जेतेपदावर नाव काही कोरता आलेलं नाही. यंदा तरी आरसीबी संघ जेतेपदावर नाव कोरेल अशी बाभडी आशा आरसीबीप्रेमी बाळगून असतात. 17व्या पर्वात आता पुन्हा एकदा आशा धरून आहेत.

2 / 5
मागच्या पर्वात आरसीबीने जबरदस्त कमबॅक केलं होतं. सुरुवातीचे सात सामने गमावले होते. त्यानंतर कमबॅक करत सलग सहा सामने जिंकले आणि बाद फेरीत स्थान मिळवलं होतं. पण पुढचा प्रवास काही झाला नाही. या पर्वात आरसीबी संघाच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिस आता 39 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे पुढील मोसमात आरसीबी संघात दिसण्याची शक्यता नाही.

3 / 5
विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करताच त्याच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद असल्याने विराट कोहलीने आरसीबी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता त्याच्याकडे कोणतीच जबाबदारी नाही. त्यात टी20 वर्ल्डकप जिंकल्याने त्याचा आत्मविश्वासही दुणावलेला असेल.

4 / 5
विराट कोहली पुन्हा आरसीबी संघाची धुरा सांभाळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी त्याची मनधरणीही सुरु आहे. किंग कोहली आयपीएल 2025 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार म्हणून पुन्हा दिसण्याची दाट शक्यता आहे.

5 / 5
विराट कोहलीने 143 सामन्यात आरसीबीचे नेतृत्व केले असून 66 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.