रोहित की विराट? सोनाली बेंद्रेचा आवडता क्रिकेटर कोण? अभिनेत्री म्हणाली..
Virat Kohli IPL 2024 : तुझा आवडता क्रिकेटपटू कोण? या प्रश्नासह रोहित शर्मा आणि विराट कोहली असे 2 पर्याय अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला देण्यात आले. यावर सोनाली बेंद्रे हीने कुणाचं नाव घेतलं?
1 / 6
विराट कोहली आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमध्येही धमाका केलाय. विराटने आपल्या खेळीच्या जोरावर मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. यामध्ये बॉलीवूडचाही समावेश आहे. विराट अनेक अभिनेत्रींचा क्रिकेटर म्हणून आवडता आहे. यामध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीचाही समावेश आहे.
2 / 6
सोनाली बेंद्रे हीने नुकतंच शुभांकर मिश्रा याला युट्यूब चॅनेलसाठी मुलाखत दिली. सोनालीला मुलाखतीत रोहित शर्मा आणि विराट कोहली पैकी आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने विराट कोहलीचं नाव घेतलं.
3 / 6
विराट प्रेरणादायी आहे. मला अनुष्काही आवडते. मला त्या दोघांची जोडी चांगली वाटते, असं सोनालीने म्हटलं.
4 / 6
विराट कोहली आणि अनुष्का या जोडीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. एकट्या विराटचेच इंस्टाग्रामवर 268 मिलियन फॉलोवर्स आहेत.
5 / 6
विराट कोहलीने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. विराटने या हंगामातील 12 सामन्यांमध्ये 5 अर्धशतक आणि 1 शतकासह 634 धावा केल्या आहेत.
6 / 6
विराट 17 व्या मोसमातील ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. विराट सर्वाधिक धावा करण्याबाबत नंबर 1 आहे.