वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित झालं आहे. उर्वरित चार पैकी एक सामना जिंकताच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. या स्पर्धेत भारताचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत.
विराट कोहली याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 95 धावांची खेळी केली. यासह सुरु असलेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. पाच सामन्यात विराट कोहली याने 300 हून अधिक धावा केल्या आहेत.
विराट कोहली याने न्यूझीलंड विरुद्ध 95 धावा करताच रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहित शर्मान याने पाच सामन्यात 311 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर 354 धावा आहेत.
विराट कोहली याने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील एका पर्वात विजयी लक्ष्य गाठताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिलं स्थान गाठलं आहे. रोहित शर्मा दुसऱ्या, तर 2007 मध्ये 280 धावा करणारा ग्रीम स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्यात सर्वाधिक यशस्वी 50 हून अधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध विराट कोहलीने 95 धावा करताच 137 वेळा अशी कामगिरी केली. तर सचिनने 136 वेळा असं केलं आहे. तर या यादीत 167 वेळा अशी कामगिरी करत पहिल्या स्थानावर आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये 12 व्यांदा 50 हून अधिक धावा करणाऱ्या कुमार संगकारा आणि शाकिब अल हसन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोघांनी 12 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी असून 21 वेळा अशी कामगिरी केली आहे.