T20 World Cup 2024 : हे 3 फलंदाज ठरणार प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी, मुंबईच्या एकाचा समावेश
Icc T20I World Cup 2024 : टीम इंडियाला 2007 पासून टी 20 आणि 2011 नंतर वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा आहे.
1 / 6
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करत आहेत. टीम इंडियाचे 3 फलंदाज हे प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरु शकतात.
2 / 6
विराट कोहली, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे तिघे टी 20 वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार बॅटिंग करु शकतात. संजूने 17 व्या हंगामात 11 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 417 धावा केल्या आहेत.
3 / 6
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी आणि 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असलेला शिवम दुबे धमाका करु शकतो. शिवमने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 350 धावा केल्या आहेत.
4 / 6
शिवम दुबे टीम इंडियासाठी फिनीशरची भूमिका बजावू शकतो. तसेच त्याच्याकडून 1-2 विकेट्सची अपेक्षा असणार आहे.
5 / 6
विराट कोहली झंझावाती बॅटिंग करण्यात माहिर आहेत. विराटने आतापर्यंत 17 व्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटकडून वर्ल्ड कपमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.
6 / 6
विराटने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे.