टीम इंडियाने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कप 2023 मधील सलग चौथा विजय ठरला. बांगलादेशने विजयाासाठी दिलेलं 257 धावांचं आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्स गमावून 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शतकवीर विराट कोहली टीम इंडियाचा हिरो ठरला.
विराट कोहली याने सिक्स ठोकत आपलं 48 वं वनडे शतक पूर्ण केलं. तसेच टीम इंडियाला विजयी केलं. विराटने 97 बॉलमध्ये 103 धावा केल्या. विराटने या दरम्यान मोठा विक्रम केला. विराटने दिग्गज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराट कमी डावात वेगवान 26 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने 567 डावांमध्ये ही कामगिरी केली.
सचिन तेंडुलकर याने 600 डावांमध्ये 26 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने सचिनच्या तुलनेत 33 डावांआधीच हा कारनामा केला.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. रिकी पॉन्टिंगने सचिनपेक्षा 24 अधिक म्हणजेच 624 डावात 26 हजार धावा केल्या.
तर श्रीलंकेचा माजी विकेटकीपर-कर्णधार याला 26 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रिकीच्या तुलनेत 1 डाव अधिक जास्त लागला. कुमारने 625 डावांमध्ये 26 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.