विराट कोहलीचं पुढचं भवितव्य आता आयपीएलवर! बीसीसीआयच्या त्या निर्णयामुळे पेच
आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेतून विराट कोहली क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या एक महिन्यापासून विराट कोहली क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे आता पुढील वाटचाल ही आयपीएलवर अवलंबून असणार आहे.
1 / 6
आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या जेतेपदासाठी आतुर आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यातून विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.
2 / 6
17 जानेवारी 2024 नंतर विराट कोहली एकही सामना खेळलेला नाही. आता आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. किंग कोहलीचे टी20 विश्वचषकाचं भवितव्य या स्पर्धेवर अवलंबून आहे.
3 / 6
आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी20 वर्ल्डकप संघात देण्यात येईल असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षभरापासून विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नव्हता. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केलं. पण हवी तशी छाप सोडता आली नाही.
4 / 6
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत 2 सामने खेळणाऱ्या कोहलीने एका सामन्यात 29 धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे टी20 विश्वचषक संघ निवडीसाठी विराट कोहलीचा विचार केला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
5 / 6
टी20 विश्वचषक संघ निवडीसाठी आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला जाईल, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विराट कोहलीला आयपीएलमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागेल. त्यानंतरच त्याच्या निवडीसाठी विचार केला जाईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
6 / 6
विराट कोहलीचे टी20 विश्वचषकातील भवितव्य आयपीएलच्या 14 सामन्यांमधील कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे विराट कोहली आता आपली छाप 14 सामन्यात सोडतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.