रनमशिन्स विराट कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर, आता मोडणार सचिनचा रेकॉर्ड

| Updated on: Jul 18, 2023 | 8:53 PM

विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. गेल्या एका दशकापासून विराटने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत. आता आणखी एका विक्रमाची नोंद करणार आहे.

1 / 5
विराट कोहलीला क्रिकेट विश्वात रनमशिन्स असं संबोधलं जातं आहे. एक दशकाहून अधिक काळ खेळणाऱ्या विराट कोहलीने संघाला विजय मिळवून देण्याचं त्याचं मोठं योगदान आहे.

2 / 5
विराट कोहली याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. कर्णधारपद सोडलं असलं तरी तो संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. विराट कोहली याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आहेत.

3 / 5
विराट कोहली आता क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या सचिनच्या विक्रमाजवळ आला आहे. सध्या विराट कोहली संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

4 / 5
सचिन तेंडुलकरने 307 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर विराट कोहली 296 सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. धोनी 295, रोहित शर्मा 277 आणि युवराज सिंग याने 227 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.

5 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी 12 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतर पहिल्या स्थानावर विराजमान होणार आहे.