बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानात उलथापालथ, तीन आठवड्यात दिग्गजाचा राजीनामा

| Updated on: Aug 26, 2024 | 8:00 PM

पाकिस्तान आणि बांग्लादेश य़ाच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत बांगलादेशने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर दिग्गजाने राजीनामा दिला आहे.

1 / 6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये काहीच व्यवस्थित नसल्याचं दिसून आलं आहे. सलग होत असलेल्या पराभवानंतर पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे. कसोटीत बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर यात आणखी भर पडली आहे.

2 / 6
पाकिस्तानची क्रिकेटमधील कामगिरी पाहून चाहत्यांचा संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून पाकिस्तानवर टीका होत आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटू वकार युनिसने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

3 / 6
वकार युनिसने तीन आठवड्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्य सल्लागाराची सूत्र हाती घेतली होती. बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर वकार युनिसने आपल्या पदाचा राजीनामा झाला.

4 / 6
स्पोर्टटॉकच्या रिपोर्टनुसार, वकार युनिसला काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे. फ्री हँड नसल्याने वकार युनिसने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

5 / 6
वकार युनिसच्या आधी ही ऑफर वसीम अक्रमला देण्यात आली होती. पण त्याने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर वकार युनिसने पद स्वीकारलं. पण तीन आठवड्यातच पद सोडलं.

6 / 6
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असल्याचं स्पोर्ट्स टॉकने आपल्या वृत्तात म्हटले आहे. आता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. आता या पदावर कोण येतं याची उत्सुकता लागून आहे