WBBL 2024 : वुमन्स बिग बॅश लीगमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला, ड्राफ्टमध्ये 19 खेळाडूंचा समावेश

| Updated on: Aug 27, 2024 | 10:27 PM

वुमन्स बिग बॅश लीगचं बिगुल वाजलं असून यंदा 10वं पर्व आहे. या स्पर्धेसाठी ड्राफ्टमध्ये 19 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीतून 8 फ्रेंचायझी खेळाडूंची निवड करतील.

1 / 5
वुमन्स बिग बॅश लीग टी20 स्पर्धा 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत ॲडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हीट, होबार्ट हरिकेन्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्कॉचर्स, सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर असे एकूण 8 संघ असणार आहेत.

2 / 5
महिला बिग बॅश लीगसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ड्राफ्टमध्ये 19 भारतीय खेळाडूंची नावे आली आहेत. या यादीत टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

3 / 5
हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, श्रेयंका पाटिल, तितास साधु, आशा शोभना, राधा यादव, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया, शिखा पांडे, स्नेह राणा, हेमलता दयालन, संजना संजीवन, मन्नत कश्यप, मेघना सब्बिनेनी, वेदा कृष्णमूर्ति, मोना मेश्राम आणि मेघना सिंह हे 19 खेळाडू आहेत.

4 / 5
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून बिग बॅश लीगच्या 10व्या पर्वाची तयारी सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात खेळाडूंची निवड सुरु झाली आहे. टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना ॲडलेड स्ट्रायकर्स संघात सामील झाली आहे.

5 / 5
यापूर्वी स्मृती मानधना ब्रिस्बेन हीट, होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी थंडर संघाकडून खेळली होती. पण यावेळी ॲडलेड स्ट्रायकर्सने तिला संघात घेण्यात यश मिळवलं आहे.