धवन, मलाननंतर 166 विकेट घेणाऱ्या क्रिकेटपटूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Aug 29, 2024 | 2:54 PM

क्रिकेटरसिकांना आठवड्याभरात तिसरा धक्का बसला आहे. शिखर धवन आणि डेविड मलाननंतर आणखी एका क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. वयाच्या 36व्या वर्षी त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 59 कसोटी, 25 वनडे आणि 2 टी20 सामने खेळला आहे.

1 / 5
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन ग्रॅब्रियल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. शॅनन 12 वर्षे वेस्ट इंडिज संघासाठी खेळला. 2012 मध्ये त्याने वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजसाठी एकूण 86 सामने खेळला.

2 / 5
शॅनन गॅब्रियलने सांगितलं की, '"गेल्या 12 वर्षांमध्ये मी वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी स्वत:ला समर्पित केले आहे. सर्वोच्च स्तरावर मला आवडणारा खेळ खेळल्याने मला खूप आनंद झाला आहे. जसं सांगितलं जातं की सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट झाला पाहीजे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे.'

3 / 5
2012 मध्ये वेस्ट इंडिज संघात पदार्पण केलेल्या शॅनन ग्रॅब्रियलने 59 कसोटी सामन्यातील 104 धावात 166 विकेट घेतल्या आहेत. 104 डावांमध्ये 32.21 च्या सरासरीने आणि 3.42 च्या इकॉनॉमीने 166 बाद केले.13/121 ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

4 / 5
शॅनन गॅब्रियलने 25 वनडे सामन्यांमध्ये 1148 चेंडू टाकत 33 विकेट्स घेतल्या आहेत. तर वेस्ट इंडिजकडून फक्त 2 टी20 सामन्यात खेळत गॅब्रिएलने 3 बळी घेतले.

5 / 5
वेस्ट इंडिजचा अनुभवी वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएल बराच काळ संघाबाहेर होता. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता. त्याला 2019 पासून वनडे संघात आणि 2013 पासून टी20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही.