ENG vs WI : शाई होपने विव रिचर्ड्स आणि विराट कोहलीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी, जाणून घ्या काय ते

| Updated on: Dec 04, 2023 | 7:25 PM

ENG vs WI, Shai Hope: वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत वेस्ट इंडिज पात्र होऊ शकली नाही. दोन वेळा जेतेपद मिळवलेल्या वेस्ट इंडिजची ही स्थिती पाहून क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरला होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता संपली असून वेस्ट इंडिजने पुन्हा नव्या दमाने कामाला लागली आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील अँटिग्वा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडिजसाठी शाई होपने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि विक्रम रचले.

1 / 7
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील अँटिग्वा येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडिजकडून शाई होपने जबरदस्त खेळी केली. शतकासह काही विक्रमांची बरोबरी साधली आहे.

2 / 7
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने 83 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 109 धावांची खेळी केली. या खेळीसह शाई होपने एकदिवसीय कारकिर्दीत 5000 धावांचा टप्पा पार केला.

3 / 7
शाई होप वनडेमध्ये जलदगतीने 5000 धावा करणाऱ्या विव रिचर्ड्स आणि विराट कोहलीच्या यादीत सहभागी झाला आहे. शाई होप वनडे सामन्यात सर्वात जलद 5000 धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

4 / 7
पहिल्या स्थानावर पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझम आहे. त्याने 97 डावांमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या हाशिम आमलाने 101 डावांमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला.

5 / 7
तिसऱ्या स्थानावर विव रिचर्ड्स आणि विराट कोहली संयुक्तरित्या आहेत. त्यांनी 114 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. आता शाई होपनेही 114 डावात 5 हजार धावा पूर्ण करून त्यांच्यासोबत आला आहे.

6 / 7
इंग्लंड विरुद्ध शतकी खेळी करत 114 व्या सामन्यात 16 वं शतक होप पाचवा फलंदाज ठरला आहे. भारताच्या विराट कोहलीने अवघ्या 100 डावात ही कामगिरी केली होती.

7 / 7
पहिल्या क्रमांकावर बाबर आझमने 84 डावात 16 शतकं, तर हाशिम आमला याने 94 डावांमध्ये 16 शतकं झळकावली आहेत. त्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो.