Jonny Bairstow Girlfriend : काय गर्लफ्रेंड हाय राव, असं जॉनी बेअरस्टोची गर्लफ्रेंड बघून म्हणाल, जाणून घ्या ‘ती’ कोण…
एलेनॉर टॉमलिन्सनच्या कारकिर्दीबद्दल बोलायच तर ती एक लोकप्रिय ब्रिटीश अभिनेत्री आहे. तिनं लहानपणापासूनच उद्योगात काम करायला सुरुवात केली आणि जॅक द जायंट सेलरमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळख झाली.
1 / 7
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळतोय. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतानं इंग्लंडच्या संघाला 378 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्षाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी शानदार खेळी खेळताना आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. आज पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. यापूर्वी जॉनी बेअरस्टोनेही इंग्लंडकडून पहिल्या डावात शतक झळकावलं होतं. बेअरस्टो हा इंग्लंडमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. बेअरस्टोची गर्लफ्रेंडही त्याच्यासारखीच खासमखास आहे. आज आम्ही तुम्हाला जॉनी बेअरस्टोच्या गर्लफ्रेंडविषयी सांगणार आहोत.
2 / 7
जॉनी बेअरस्टोची गर्लफ्रेंड एलेनॉर टॉमलिन्सन ही एक प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री आणि गायिका आहे. एलेनॉरनं अँगस, जॅक द जायंट स्लेअर, थॉन्ग्स आणि परफेक्ट स्नॉगिंग यांसारख्या इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केलंय आहे.एलेनॉर टॉमलिन्सनचा जन्म 19 मे 1992 रोजी लंडनमध्ये झाला. ती लहान असताना तिचे कुटुंब यॉर्कशायरला गेले. तिची आई ज्युडिथ हिल्बर्ट ही गायिका आणि वडील माल्कम टॉमलिन्सन अभिनेता आहेत. तिला एक भाऊ आहे. त्याचं नाव रॉस टॉमलिन्सन असून तोही अभिनेता आहे
3 / 7
एलेनॉर टॉमलिन्सन ही 2018 पासून इंग्लंडचा क्रिकेटर जॉनी बेअरस्टोसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसले देखील आहेत. पण दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत.
4 / 7
दोघांची भेट एका रेसकोर्सवर झाल्याचं सांगितलं जातं. जिथे दोघांनी खूप वेळ एकमेकांसोबत घालवला आणि इथूनच त्यांची मैत्री झाली.जॉनी बेअरस्टोच्या आधी एलेनॉर टॉमलिन्सन देखील तिचा पोल्डार्क अभिनेता हॅरी रिचर्डसनसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
5 / 7
एलेनॉर टॉमलिन्सननं 2008 मध्ये सीन बोर्केला डेट केलं आणि त्यानंतर ती पोल्डार्कमध्ये एडन टर्नरचा स्टंटमॅन बेन ऍटकिन्सनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही दोन वर्षे डेट करत होते.
6 / 7
एलेनॉर टॉमलिन्सनच्या कारकिर्दीबद्दल बोलायच तर ती एक लोकप्रिय ब्रिटीश अभिनेत्री आहे. तिनं लहानपणापासूनच उद्योगात काम करायला सुरुवात केली आणि जॅक द जायंट सेलरमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळख झाली. अलीकडेच ती बीबीसी टेलिव्हिजन आऊटलॉजसाठी कॉमेडी ड्रामामध्ये दिसली. यामध्ये तिनं गॅबीची भूमिका साकारली होती.
7 / 7
जॉनी बेअरस्टोबद्दल बोललो, तर तो इंग्लंडच्या संघाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यानं भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली आणि चौथ्या दिवसापर्यंत 72 धावांची नाबाद खेळी खेळली. यापूर्वी त्यानं इंग्लंडच्या पहिल्या डावात 106 धावा केल्या होत्या.