IND vs IRE: टीम इंडियाचा आयर्लंडविरुद्धचा टी20 रेकॉर्ड काय सांगतो? जाणून घ्या
IND vs IRE: क्रिकेटमध्ये आयर्लंडकडे एक दुबळा संघ म्हणून पाहिलं जातं. पण ऐन मोक्याची क्षणी सामन्याचं चित्र पालटून टाकण्याची क्षमता या संघात आहे. 2008 पासून आयर्लंडने एकूण 152 टी20 सामने खेळले आहेत. आयर्लंडने 65 सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित ठरला आहे.
1 / 7
भारत आणि आयर्लंड यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. दोन्ही संघांमधला पहिला टी20 सामना 18 ऑगस्टला शुक्रवारी डब्लिनमधील द व्हिलेज मैदानावर होणार आहे.
2 / 7
टीम इंडियाच्या तुलनेत आयर्लंडचा संघ दुबळा म्हणून गणला जात आहे. असं असलं तरी लोर्कन टकर, कर्टिस कँपर, हॅरी टॅक्टर आणि जोशुआ लिटल सारख्या प्रतिभावान आयरिश खेळाडूंकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
3 / 7
2008 पासून आयर्लंडने एकूण 152 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 65 सामने जिंकले आहेत, एक सामना अनिर्णित राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि आयर्लंड यांच्यात पाच सामने झाले आहेत. टीम इंडियाने पाचही सामने जिंकले आहेत.
4 / 7
2009 च्या टी20 विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले होते. आयरिश संघाला बलाढ्य भारतीय संघाला झुंज देता आली नाही. या सामन्यात आठ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.भारताने मागच्या दोन टी20 सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. 76 आणि 143 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
5 / 7
घरच्या मैदानावर आयर्लंडचा रेकॉर्डही खराब आहे, घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 43 सामन्यांपैकी आयर्लंडने केवळ 13 सामने जिंकले आहेत आणि 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
6 / 7
टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रवि बिश्णोई, प्रसिद कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, अवेश खान
7 / 7
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, रॉस अडायर, हॅरी टॅक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँपर, जॉर्ज डॉकरेल, फिओन हैंड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क अडायर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, थियो वॅन वोर्कोम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग