वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात होणार आहे. मात्र पाकिस्तानने स्पर्धेच्या आयोजनावरून सुरु केलेला वाद अजून संपलेला नाही. पाकिस्तानचा संघ भारतात येणार की नाही? यावर चर्चा सुरु आहे. पीसीबीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, भारतात येण्याचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. त्यामुळे पाकिस्तान संघाला सरकारने परवानगी नाकारली तर स्पर्धेचं काय होईल? जाणून घ्या.
सरकारकडून पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात जाण्याची परवानगी मिळाली नाही, तर वनडे वर्ल्डकपवर काहीच फरक पडणार नाही. पण आयसीसीकडून पाकिस्तानला शिक्षा मिळू शकते.
दुसरीकडे, आयसीसीने पाकिस्तान ऐवजी दुसऱ्या संघाला संधी दिली नाही, तर स्पर्धा 9 संघांमध्ये खेळली जाईल. त्यामुळे प्रत्येक संघाच्या खात्यात 2 गुणांची भर पडेल.
पाकिस्तानने या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतला नाही तर पहिल्यांदाच पाकिस्तानशिवाय वर्ल्डकप होईल. पाकिस्तानने 1992 मध्ये वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर अजूनही जेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे.