विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर बरेच विक्रम आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 17 पर्वात त्याने 114 झेल पकडले आहेत. यंदाच्या पर्वात आणखी भर पडेल.(PHOTO- PTI)
चेन्नई सुपर किंग्सचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यादीत आहे. मिस्टर आयपीएल म्हणून त्याची ख्याती सर्वदूर आहे. सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 205 सामन्यात 109 झेल पकडले आहेत. (PHOTO- IPL)
मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 189 सामन्यात 103 झेल पकडले आहेत. (PHOTO- IPL)
अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्स संघात असलेला रवींद्र जडेजा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 240 सामन्यात 103 झेल पकडले आहेत. यंदाच्या पर्वात त्याने 7 झेल पकडले तर किरोन पोलार्ड आणि सुरेश रैना या दोघांना मागे टाकेल. (PHOTO- PTI)
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माही या यादीत आहे. त्याने 257 सामन्यात 101 झेल पकडले आहेत. यंदा त्याच्याकडे यात आणखी भर घालण्याची संधी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. (PHOTO- PTI)