आयपीएलच्या 18 व्या मोसमाची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. या मोसमासाठी सर्व तयारी झाली आहे. कर्णधारांचं फोटो सेशनही पार पडलं. या हंगामानिमित्ताने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक सामने खेळले आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Ipl X Account)
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑलराउंडर रवींद्र जडेजा पाचव्या स्थानी आहे. जडेजाने विविध संघांकडून आतापर्यंत 240 सामने खेळले आहेत. (Photo Credit : PTI)
अनुभवी फलंदाज विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी आहे. विराट 2008 पासून बंगळुरुसाठी खेळतोय. विराटने एकूण 17 हंगामांमध्ये 252 सामने खेळले आहेत. (Photo Credit : PTI)
'हिटमॅन' रोहित शर्मा याने एकूण 257 सामने खेळले आहेत. रोहित सध्या मुंबईसाठी खेळतो. त्याआधी रोहितने 'डेक्कन चार्जर्स हैदराबाद'संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.(Photo Credit : PTI)
अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने 17 व्या मोसमानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली. कार्तिकनेही रोहितप्रमाणे 257 सामने खेळले आहेत. कार्तिक सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : PTI)
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे. धोनीने एकूण 17 हंगामात सर्वाधिक 264 सामने खेळले आहेत. (Photo Credit : PTI)