काव्या मारन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आयपीएलचं ऑक्शन असो की आयपीएलची मॅच, प्रत्येक ठिकाणी कॅमेरामन तिच्यावर फोकस करताना दिसतात ते उगाच नव्हे! सध्या तरुणाईमध्ये काव्या मारनची क्रेझच तशी आहे. (Photo Source - Twitter)
आयपीएल लिलावावेळी काव्या मारन सनरायजर्स हैदराबाद संघाच्या मॅनेजमेन्टसोबत दिसली. इतकंच काय तर तिनं खेळाडूंवर बोलीही लावली. (Photo Source - Twitter)
न्ययॉर्कमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलेल्या काव्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. एमबीए झाल्यानंतर काव्या मारन सनरायझर्स हैदराबाद संघासोबत स्ट्रॅटजीस्ट म्हणून काम करते. (Photo Source - Twitter)
दक्षिणेतील एका बड्या टीव्ही नेटवर्कचे मालक असलेल्या कलानिधी मारन यांची ती मुलगी आहे. कलानिधी मारन हे सन टीव्हीचे मालक असून त्यांच्या नेटवर्कचे एकूण 32 चॅनेल आणि 24 एफएम रेडिओ स्टेशन आहेत. (Photo Source - Twitter)
चेन्नईतील एका कॉलेजमधून बीकॉमची डिग्री घेतल्यानंतर काव्या ही फक्त आयपीएलच्या लिलावतच दिसली अशातला भाग नाही. तर आयपीएलच्या सामान्यांमध्येही तिची हजेरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. (Photo Source - Twitter)
देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या बिझनेस वुमन्सपैकी काव्या मारन ही एक आहे. वडील मोठ्या टीव्ही नेटवर्कचे मालक असूनही काव्यानं सगळ्यात आधी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर ती आताएवढ्या उंचीपर्यंत पोहोचली आहे. (Photo Source - Twitter)
काव्याचा जन्म 1992 साली झाला असून सध्या ती सनरायझर्स हैदराबादच्या स्ट्रॅटर्जी टीममध्ये काम करते. तसंत डिजीटल मार्केटींगचाही काव्या भाग असून काव्या ही सन एनएक्सटीची प्रमुख आहे. (Photo Source - Twitter)