Shruti Raghunathan | वेंकटेश अय्यर याची भावी पत्नी श्रुती रघुनाथन नक्की कोण?
Shruti Raghunathan | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेच्या काही तासांआधी टीम इंडियाचा युवा वेंकटेश अय्यर याने साखरपुडा उरकला आहे.
1 / 6
टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारा युवा फलंदाज वेंकटेश अय्यर याने नव्या इनिंगच्या दिशेने वाटचाल केली आहे. वेंकटेश अय्यर याचा साखरपुडा झाला आहे.
2 / 6
वेंकटेश अय्यर आणि श्रुती रघुनाथन यांचा साखरपूडा केला आहे. वेंकटेशने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. वेंकटेशची होणारी भावी बायको नक्की कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
3 / 6
वेंकटेशची होणारी पत्नी श्रुती हीच्याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र श्रुतीने विज्ञान शाखेतून पदवी शिक्षण घेतलं आहे.
4 / 6
श्रुतीने पदवीनंतर एनआयएफटीमधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. रिपोर्ट्सनुसार, श्रुती एका खासगी कंपनीत नोकरी करते.
5 / 6
वेंकटेश अय्यर याने आंतरराष्ट्रीय डेब्यू केलंय. मात्र वेंकटेशला गेल्या 2 वर्षांपासून त्याला टीम इंडियात संधी मिळालेली नाही.
6 / 6
मात्र वेंकटेश आयपीएलमध्ये सातत्याने खेळतोय. वेंकटेश काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल 2023 मध्ये सहभागी झाला होता.