Team India Coach | टीम इंडियाचा कोच होण्यासाठी या चौघांमध्ये चुरस
राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघाने अतुलनीय कामगिरी केली. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात अपयश आलं. आता वर्ल्ड कपसह राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला आहे.
1 / 5
2 / 5
आशिष नेहरा हा कोच पदासाठी दावेदार आहे. टीम इंडियातून निवृत्त झाल्यानंतर नेहराने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स टीमच्या बॉलिंग कोचची जबाबदारी सांभाळली. नेहराने आपल्या मार्गदर्शनात 2022 मध्ये गुजरातला पहिल्याच वर्षात आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.
3 / 5
न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग हा देखील हेड कोच या पदासाठी दावेदार आहे. फ्लेमिंग यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक आहे. फ्लेमिंग याच्या मार्गदर्शनात आयपीएलमध्ये सीएसकेने 2010,2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
4 / 5
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज टॉम मूडी हे आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमचं कोच राहिले आहेत. मूडी यांच्या मार्गदर्शनात एसआरएचने एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मूडी यांनी 2017 मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिली होती. मात्र तेव्हा त्यांची निवड करण्यात आली नाही.
5 / 5
तसेच प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा देखील आहे. सेहवागला बॅटिंगचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे वीरेंद्र सेहवाग हा देखील प्रशिक्षकपदासाठी अर्ज करु शकतो.