रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार कोण? प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी स्पष्ट केलं की…

| Updated on: Jan 11, 2025 | 2:42 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अद्याप एकही जेतेपद मिळवलेलं नाही. मागच्या 17 पर्वात आरसीबीच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे 18 व्या पर्वात नव्या संघासह मैदानात उतरणार आहे. यंदाच्या पर्वात संघाचं नेतृत्व कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. असं असताना प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी स्पष्ट काय ते सांगून टाकलं आहे.

1 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आणि विराट कोहली एक वेगळंच नातं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 2016 मध्ये आरसीबीने अंतिम फेरी गाठली होती. पण त्यानंतर विराटने संघाचं नेतृत्व सोडलं आणि खेळाडू म्हणून संघात राहिला. त्यानंतर फाफने ही जबाबदारी पेलली. पण आता फाफही संघात नसल्याने ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर पडणार हा प्रश्न आहे. असं असताना आरसीबी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी याबाबत मत मांडलं आहे.

2 / 6
आरसीबीचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, आरसीबीचा पुढचा कर्णधार कोण असेल याबाबत अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर असेल हे सांगणं कठीण आहे. पण पुढील तीन वर्षासाठी नेतृत्व निवडलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

3 / 6
आयपीएल 2025 मेगा लिलावानंतर आरसीबी संघाचं रुपडं पालटलं आहे. नव्या खेळाडूंसह संघ बांधणी करण्यात आली आहे. काही जुने आणि नवे अशी पुन्हा एकदा सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे तीन वर्षात या संघाकडून अपेक्षा आहेत. अँडी फ्लॉवर यांनी सांगितलं की, संघाचं कर्णधारपद दीर्घकाळ करू शकेल अशा खेळाडूकडे देणार आहोत.

4 / 6
अँडी फ्लॉवरने विराट कोहलीला कर्णधारपद देणार की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत त्यांना वारंवार विचारणा करण्यात आली. पण त्यांनी एकच उत्तर दिलं की, आता सांगता येणार नाही. तसेच याबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचही स्पष्ट केलं.

5 / 6
आरसीबी संघात असलेल्या 22 खेळाडूंपैकी विराट कोहलीकडेच नेतृत्व अनुभव आहे. त्यामुळे पहिली पसंती विराट कोहली असणार यात काही शंका नाही. कारण विराट कोहलीने 143 सामन्यात आरसीबी संघाचं नेतृत्व केलं आहे.

6 / 6
विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने 66 सामने जिंकले आहेत. तसेच 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेशही केला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या खांद्यावर पुन्हा एकदा धुरा आल्यास आश्चर्य वाटायला नको.