मुंबई इंडियन्सच्या रिटेन्शन खेळाडूंच्या यादीत कोण असेल? हरभजन सिंगने सांगितली नावं
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक फ्रेंचायझीला सहा खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. असं असताना मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, हरभजन सिंगने रिटेन करणाऱ्या खेळाडूंची नावं सांगून टाकली.
1 / 6
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण मागच्या तीन पर्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे आयपीएल 2024 स्पर्धेत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपण्यात आलं होतं.
2 / 6
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याची उत्सुकता आहे. खासकरून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे कोणाला रिटेन करणार कोणाला रिलीज याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
3 / 6
हरभजन सिंगच्या मते मुंबई इंडियन्स पाच खेळाडूंना रिटेन करू शकते. यात रोहित शर्मा असेल यात शंका नाही, असं त्याने सांगितलं. कारण त्याने भारताला टी20 वर्ल्डकप जिंकून दिला आहे.
4 / 6
हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना मुंबई इंडियन्स रिटेन करेल, असं हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.
5 / 6
दिग्गज चार खेळाडूंव्यतिरिक्त तिलक वर्माला संघात ठेवलं जाईल. कारण त्याच्याकडे मुंबई इंडियन्सचं भवितव्य म्हणून पाहिलं जात आहे.
6 / 6
अनकॅप्ड प्लेयर म्हणून नेहल वढेरा हा सहावा खेळाडू ठरू शकतो. भविष्यात मुंबई इंडियन्सच्या विजयात त्याचा वाटा असू शकतो. त्यामुळे या सहा खेळाडूंना हरभजन सिंगने पसंती दिली आहे.