ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडू मेडल का चावतात? या मागचं कारण जाणून घ्या
ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी असते. यासाठी खेळाडू जीवाचं रान करतात. पण काही जणांच्या पदरी यश, तर काही जणांच्या पदारी निराशा पडते. त्यामुळे यशाची चव काय असते हे खेळाडूंपेक्षा जास्त कोण सांगू शकतं? असं असताना तुम्ही पदक विजेत्या खेळाडूंना मेडल चावताना पाहिलं असेल. चला जाणून घेऊयात या मागचं कारण
1 / 5
ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं की आनंदाला पारावर उरत नाही. काय करू आणि काय नको असं होतं. अश्यात अनेक स्पर्धेत मेडल दाताने चावताना दिसतात. असं करण्यामागचं नेमकं काय कारण असावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर त्या बाबत जाणून घ्या.
2 / 5
मेडल चावण्याचं नेमकं कारण काय असावं? ही प्रथा कधीपासून सुरु झाली असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात. जुन्या काळात सोन्याची पारख करण्यासाठी व्यापारी सोन्याची नाणी दाताने चावायचे. खेळाडूही त्यासाठी असंच करत असावे असा अनेकांचा समज आहे. पण हे त्या मागचं कारण नाही.
3 / 5
ऑलिम्पिकमध्ये दिलं जाणारं मेडल हे पूर्ण सोन्याचं नसतं. त्यात सोन्यापेक्षा चांदीचा वापर जास्त केला जातो. मात्र 1912 ऑलिम्पिकपूर्वी शुद्ध सोन्याचं मेडल दिलं जात होतं. पण आता तसं नाही. त्यामुळे स्पर्धक विजयी झाल्यानंतर मेडल मिळवल्यानंतर ते चावून आपली मेहनत आणि उत्साह दाखवून देतात.
4 / 5
ऑलिम्पिक वेबसाईटनुसार, एथलीट फोटो काढण्यासाठी मेडल दाताने चावतात. पोजसाठी फोटोग्राफर त्यांना असं करण्यास सांगतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रेंड सुरु आहे.
5 / 5
2010 ऑलिम्पिक स्पर्धेत विजयानंतर जर्मनीच्या लुगर डेविड मोलरने मेडल चावताना आपला दात तोडला होता. त्याने स्वत:च याबाबतचा खुलासा केला होता.