World Cup 2023: वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला का मिळत नाही खरी ट्रॉफी? जाणून घ्या कारण

| Updated on: Oct 11, 2023 | 3:51 PM

World Cup 2023 Trophy: वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु झाली आहे. दहा संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. पण प्रश्न असा आहे की, विजेत्या संघाला खरीखुरी ट्रॉफी मिळते का? चला जाणून घेऊयात या बाबत

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13वं पर्व आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. पाच वेळा जेतेपदाची ट्रॉफी जिंकली आहे. तर भारत आणि वेस्ट इंडिजने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड या संघांनी एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. (Photo : Twitter)

2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून 19 नोव्हेंबरला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सुरुवात केली आहे.उपांत्य फेरी गाठण्यासाठी 9 पैकी 7 सामने जिंकणं आवश्यक आहे. (Photo : Twitter)

3 / 6
वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना आता गुगलवर वेगळीच माहिती सर्च केली जात आहे. विजयी संघाला कोणती ट्रॉफी मिळते? प्रत्येक शहरांमध्ये दाखवली जाणारी ट्रॉफीच विजेत्या संघाला सोपवली जाते का? चला जाणून घेऊयात (Photo : Twitter)

4 / 6
विजेत्या संघाला खरीखुरी ट्रॉफी दिली जात नाही. खरी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान ठेवली जाते आणि विजयी संघाला दिली जाते. यासोबत सर्व खेळाडू फोटो घेतात. पण ट्रॉफी घरी नेताना दुसरीच असते. तशीच दिसणारी ट्रॉफी दिली जाते. (Photo : Twitter)

5 / 6
खरी ट्रॉफी पुन्हा आयसीसी मुख्यालयात पाठवली जाते. असंच प्रत्येक वर्ल्डकपवेळी एक ट्रॉफी तयार केली जाते. ही ट्रॉफी त्याच खऱ्या ट्रॉफीची प्रतिकृती असते. यात चांदी आणि सोन्याचा वापर केला जातो. तसेच ही ट्रॉफी जवळपास 11 किलोंची असते. (Photo : Twitter)

6 / 6
भारतीय संघांची स्पर्धेतील सुरुवात एकदम जबरदस्त झाली आहे. पहिल्याच सामन्यात दिग्गज ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. 14 ऑक्टोबरला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.  (Photo : Twitter)