Rohit Sharma | रोहित शर्मा याची सुपर’हिट’कामगिरी, विंडिज विरुद्ध धमाका

| Updated on: Jul 13, 2023 | 11:06 PM

Rohit Sharma WI vs IND 1st Test Day 2 | वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने जबरदस्त कामगिरी केली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने विंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोहित शर्मा याने कसोटीत 3 हजार 500 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

2 / 5
रोहितने 51 व्या कसोटी सामन्यात 3 हजार 500 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 1 द्विशतकं, 9 शतकं आणि 15 अर्धशतकं केली आहेत.

3 / 5
रोहित टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार 500 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाार विसावा फलंदाज ठरला आहे.

4 / 5
इतकंच नाही, तर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनिंग करताना 103 वेळा अर्धशतक केलंय. याबाबतीत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने ओपनिंग करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 120 अर्धशतकं केली आहेत.

5 / 5
दरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने विंडिज विरुद्ध पहिल्या डावात 151 धावांची सलामी भागीदारी करत टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली आहे. या दरम्यान या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं ठोकली आहेत. या सलामी जोडीकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.