वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून टीम इंडियात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
जयदेव उनाडकट यांचं यासह टीम इंडियात तब्बल 10 वर्षांनी कमबॅक झालं आहे.
जयदेव उनाडकट याने अखेरचा एकदिवसीय सामना हा विंडिज विरुद्ध 21 नोव्हेंबर 2013 रोजी खेळला होता.
जयदेव उनाडकट याचा उमरान मलिक याच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय.
जयदेवने 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.