टीम इंडियाने तिसऱ्या आणि सीरिज डिसायडर वनडेमध्ये विंडिजला एकतर्फी विजय मिळवला. विंडिजचा याआधी कधीच कोणत्याही टीमने असा पराभव केला नव्हता. टीम इंडियाने या विजयासह अनेक रेकॉर्डही केलेत.
टीम इंडियाने विंडिजवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 200 धावांनी विजय मिळवला. विंडिजवर कोणत्याही टीमने धावांबाबत मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरलाय. याआधी इंग्लंडने विंडिजवर 186 रन्सने मात केली होती.
शुबमन गिल आणि ईशान किशन या दोघांनी शानदार ओपनिंग करुन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी 143 धावांची सलामी विक्रमी भागीदारी केली. टीम इंडियाकडून विंडिज विरुद्धची ही विक्रमी भागीदारी ठरली.
विंडिज विरुद्ध एका वनडेत सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. सेहवागने 2011 मध्ये 7 सिक्स ठोकले होते. आता या यादीत कॅप्टन हार्दिक पंड्या याचं नाव जोडलं गेलंय. हार्दिकने तिसऱ्या सामन्यात 5 सिक्स खेचले.
टीम इंडियाने विंडिज विरुद्ध 351 धावा केल्या. टीम इंडियाची यासह 2023 या वर्षात 350 पेक्षा अधिक धावा करण्याची चौथी वेळ ठरली.
ईशान किशन याने या मालिकेतील तिन्ही सामन्यात सलग 3 अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली. ईशान सलग 3 अर्धशतकं करणारा सहावा भारतीय ठरला.